Monday, July 9, 2007

थांब सुमंता, थांबवित रे रथ

राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवित रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडें हें आज अकल्पित!

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं अजुन कालचें
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील्हे, उष:प्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षे का अस्तंगत?

चवदा वर्षे छत्र लोपतां
चवदा वर्शे रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपें ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागे निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोदुन रामा, कोठें जातां?
सर्वे न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? केठे रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित

1 comment:

आंब्रडकरस् said...

मराठीतला 'सुंदर'संग्रह असलेला 'ब्लॉग'असे वर्णन करावे लागेल. पुढील वाटचालही अशीच दमदार असेल अशी आम्हांला खात्री आहे. धन्यवाद.